कन्नड: उद्योजक तथा समाजसेवक मनोज पुष्पाबाई केशवराव पवार यांच्या हस्ते दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या भव्य रोग निदान शिबिराच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी, मनोज भाऊ पवार यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.
शिबिराचे आयोजन पिशोर नाका येथील जैन कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार आहे.