लोणार: जागतिक पर्यटन दिन व खा. मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त फोटोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन
प्रतिनिधी : फिरदोस खान पठाण
लोणार (28 सप्टेंबर 2024) : जागतिक पर्यटन दिन आणि खा. मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोणार येथे विशेष फोटोग्राफी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीलालजी गुगलीया होते, तर उद्घाटन मा. विजय अंभारे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते, ज्यात शैलेशभाऊ सावजी (उपाध्य बु.नि.का. कमेटी), निसार शेख (व्यवस्थापक, विदर्भ अॅकेडेमी), भुषण मापारी (गटनेते), बादशहा खान (उपाध्यक्ष, नगरपरिषद), ज्ञानेश्वर मामा चिभडे (माजी सभापती, पंचायत समिती), शेख समद (शहराध्यक्ष, काँग्रेस कमिटी), अनिकेत मापारी (जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस), ज्योती राठोड (महिला तालुकाध्यक्ष), शे. करामत (माजी नगरसेवक) आणि इतर मान्यवर सहभागी होते.
या कार्यक्रमात खा. मुकुल वासनिक यांनी काढलेल्या वन्यजीव फोटोंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्याला परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. वासनिक यांच्या फोटोग्राफी कौशल्याचे सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमात निसार शेख यांचा सत्कार करण्यात आला, कारण त्यांनी परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून दिली आहे.
कार्यक्रमात आपले विचार मांडताना विजय अंभारे यांनी खा. मुकुल वासनिक यांच्या राजकीय आणि फोटोग्राफीच्या क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी विशेषतः वन्यजीव फोटोग्राफीच्या क्षेत्रात संयमाच्या महत्वाचे वर्णन केले, कारण वासनिक साहेब संयमी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे ते यशस्वी राजकारणी आणि उत्कृष्ट फोटोग्राफर झाले आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतीलालजी गुगलीया यांनी आपल्या भाषणात लोणारच्या जागतिक पर्यटन केंद्र म्हणून असलेल्या महत्त्वावर चर्चा केली. त्यानुसार, भविष्यात लोणारची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून राहणार आहे. त्यांनी वासनिक साहेबांच्या वन्यजीव फोटोग्राफीबद्दल अनोखी माहिती दिली.
प्रमुख भाषणांत बादशाह खान, शैलेश सावजी, मानवटकर सर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक गजानन खरात यांनी केले, तर सूत्रसंचालन मनीष पाटोळे यांनी केले. आभार प्रदर्शन शेख समद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. गजानन खरात आणि साहेबराव पाटोळे (अण्णाभाऊ सोशल फोरमचे प्रदेशाध्यक्ष) यांचे विशेष योगदान होते.
कार्यक्रमास माजी नगरसेवक संतोष मापारी, नितीन शिंदे, सतीश राठोड, युवक काँग्रेसचे भरत राठोड, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, युवा काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे यांसह विदर्भ अकॅडमीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.