Kannad
घुसुर तांडा येथे उद्योजक मनोज भाऊ पवार यांचा जनसंवाद दौरा यशस्वी, हनुमान मंदिरासाठी ५१,०००/- रुपये देणगी
कन्नड प्रतिनिधी : अशरफ अली
दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी उद्योजक तथा समाजसेवक श्री. मनोज पुष्पाबाई केशवराव पवार यांनी घुसुर तांडा येथे जनसंवाद दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधला. गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी ग्रामस्थांना शेती, रोजगार, गावाच्या विकासकामांबाबत मार्गदर्शन केले. तसेच, तरुणांना रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील यावर चर्चा केली.
मनोज भाऊ पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीत सक्षम उमेदवाराची निवड करून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधावा. त्यांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांना मोठे प्रोत्साहन मिळाले.
याच कार्यक्रमात त्यांनी गावातील हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी ५१,०००/- रुपये देणगी जाहीर केली. या कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती आणि ग्रामस्थांनी त्यांच्या योगदानाचे आभार मानले.