AurangabadKannad
कन्नड शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व अहेमद भाई बंबई मिठाई वाले यांचे निधन
प्रतिनिधी : अशरफ अली
कन्नड: कन्नड शहरातील सुप्रसिद्ध आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व अहेमद भाई बंबई मिठाई वाले (वय 82) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते कन्नड येथील तीळक नगर परिसरात राहत होते. त्यांची अंतिम दफन विधी सिद्धिक शाहबाबा दर्गा परिसरातील कब्रस्तान येथे करण्यात आली. त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.
अहेमद भाई यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. ते असलम भाऊ यांच्या वडिलांचे मोठे भाऊ होते. त्यांच्या निधनाने समाजातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती गमावली असून, अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.