सोशल मीडियावर द्वेषपूर्ण वक्तव्य करून दोन समाजांत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, शुभम आग्रेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
कन्नड प्रतिनिधी : अशरफ अली
पिशोर : सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा आरोप पिशोर येथील शुभम आग्रे या व्यक्तीवर करण्यात आला आहे. दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी शुभम आग्रे (मो. नं. 8407945383) याने आपल्या मोबाईलवरून मुस्लीम समाजाबद्दल आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करत “लांडे”, “भडवे”, “जेहादी” व “रजाकारी” असे अपमानास्पद शब्द वापरले. या वक्तव्यांमुळे मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तक्रारदारांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पिशोर पोलिस ठाणे यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. तक्रारदारांनी शुभम आग्रे याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
सदरील घटना सामाजिक सलोखा आणि शांततेला धोका पोहोचवणारी असल्याने पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टी कन्नडचे पदाधिकारी नासेर कालू पटेल व अन्य पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे. घटनास्थळी तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.