Buldhana

डॉ. मीना सोसे यांना वर्हाड रत्न पुरस्कार जाहीर: वर्हाडी भाषा संवर्धनातील योगदानाची दखल

प्रतिनिधी : फिरदोस खान पठाण

लोणार : येथील प्रसिद्ध स्त्री रोग चिकित्सक आणि साहित्यिक डॉ. मीना सोसे यांना यावर्षीचा अखिल भारतीय वर्हाडी साहित्य मंच, अकोला, तर्फे राज्य स्तरीय वर्हाड रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात डॉ. सोसे यांनी सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या वर्हाडी साहित्य लेखनातल्या अनोख्या योगदानाची आणि वर्हाडी भाषा जागर चळवळीतील विशेष सहभागाची दखल घेत मंचाने त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. मीना सोसे यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. विदर्भाची मायबोली असलेली वर्हाडी भाषा विदर्भाच्या सांस्कृतिक ओळखीत एक विशेष स्थान आहे. मात्र, आधुनिक काळात इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे प्राकृत मराठी भाषाच दुर्लक्षित होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक बोलीभाषा, विशेषतः वर्हाडी भाषेचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. या ध्येयाने प्रेरित होऊन अखिल भारतीय वर्हाडी साहित्य मंच, अकोला, गेल्या अनेक वर्षांपासून वर्हाडी भाषेला लोकमान्यता मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.

मंचाच्या अध्यक्ष श्याम ठक, उपाध्यक्ष निलेश कवडे, आणि मार्गदर्शक पुष्पराज गावंडे यांच्या संकल्पनेतून हा मंच वर्हाडी भाषेचे जतन आणि संवर्धनाचे महत्त्वाचे कार्य करत आहे. वर्हाडी भाषेला पुन्हा लोकांच्या हृदयात आणि व्यवहारात स्थान मिळावे, या गोड भाषेचे मोल ओळखले जावे, आणि त्याचे संवर्धन व्हावे, हा मंचाचा उद्देश आहे.

डॉ. मीना सोसे यांच्या वर्हाडी भाषेच्या संवर्धनातील कार्यामुळे विदर्भातील अनेकांना प्रेरणा मिळाली आहे, आणि त्यांचे कार्य भविष्यातही भाषेच्या समृद्धतेसाठी मार्गदर्शक ठरेल.

खासदार टाइम्स

खासदार टाईम्स {निडर, निष्पक्ष, प्रखर समाचार, खासदार की तलवार, अन्याय पे प्रहार!} हिंदी/मराठी न्यूज पेपर, डिजिटल न्यूज पोर्टल/चैनल) RNI No. MAHBIL/2011/37356 संपादक - खान एजाज़ अहमद, कार्यकारी संपादक – सय्यद फेरोज़ आशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button