Breaking NewsJalna

जनार्दन मामा चौक ते उडपी हॉटेल परिसरात जालना मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम; 45 अतिक्रमणे निष्कासित

जालना/कादरी हुसैन

जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील जनार्दन मामा चौक ते सुभाष चौक तसेच सुभाष चौक ते उडपी हॉटेल परिसरात बुधवारी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान संबंधित परिसरातील दुकानांसमोरील एकूण 45 अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.

कारवाईदरम्यान दुकानांसमोरील ओटे, पायऱ्या, शेड तसेच नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून नाले मोकळे करण्यात आले. ही मोहीम महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशान्वये तसेच सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत बी. सी. राठोड (अतिक्रमण प्रमुख) यांच्यासह त्यांचे सहाय्यक शामसन कसबे, अजय पेम्बर्ती, अमजद खान (स्वच्छता निरीक्षक), आमेर खान, शेख कादर तसेच स्वच्छता विभागातील 10 ते 12 सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. मोहिमेसाठी 1 जेसीबी, 1 टिप्पर तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

जालना शहर महानगरपालिकेमार्फत आगामी काळात शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दुकानदार व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button