Buldhana

मेहकर लोणार तालुक्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करा, नसता तीव्र आंदोलन छेडू – डॉ. गोपाल बछिरे

लोणार प्रतिनिधी : फिरदोस खान पठाण

लोणार : मेहकर आणि लोणार तालुक्यात झालेल्या परतीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी केली आहे. त्यांनी शासनाला इशारा दिला आहे की, जर मदत जाहीर केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मेहकर येथील उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, आणि कृषिमंत्री यांना निवेदन देण्यात आले. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मेहकर आणि लोणार तालुक्यातील सहा विभागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले पिक हिरावले गेले असून, याचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये डॉ. गोपाल बछिरे, गजानन जाधव, लूकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर, गजानन निकस, गजानन गीते, एकबाल कुरेशी, गोपाल वैद्य, शंकर कोकाटे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, कैलाश उबाळे, मंदाकिनी वैद्य, गोदावरी वैद्य, पंचफुला वैद्य, धुरपताबाई नरवाडे आणि अनेक शिवसैनिकांचा समावेश होता.

शिवसेनेच्या वतीने शासनाला इशारा देण्यात आला आहे की, जर तत्काळ मदत जाहीर केली नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

खासदार टाइम्स

खासदार टाईम्स {निडर, निष्पक्ष, प्रखर समाचार, खासदार की तलवार, अन्याय पे प्रहार!} हिंदी/मराठी न्यूज पेपर, डिजिटल न्यूज पोर्टल/चैनल) RNI No. MAHBIL/2011/37356 संपादक - खान एजाज़ अहमद, कार्यकारी संपादक – सय्यद फेरोज़ आशिक

Leave a Reply

Back to top button
hi Hindi