Buldhana

लोणार सरोवर परिसर प्लास्टिक व कचरा मुक्त करण्यासाठी ‘लोणारकर टीम’ चा सातत्यपूर्ण उपक्रम

फिरदोस खान पठाण

लोणार : रविवारच्या निमित्ताने लोणार सरोवर आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील ऐतिहासिक स्थळे आणि अभयारण्य क्षेत्र प्लास्टिक व कचरा मुक्त करण्यात आले. ‘लोणारकर टीम’ गेल्या 8 वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवत असून, दर रविवारी लोणार सरोवर परिसरातील स्वच्छता मोहीम आयोजित केली जाते.

या आठवड्यातील उपक्रमात धारर्तिथ ते यज्ञेश्वर मंदिर आणि लोणार अभयारण्यातील सीता नान्ही धबधबा या भागांमध्ये प्लास्टिक आणि अन्य कचरा गोळा करण्यात आला. यावेळी वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक (CCF) आदर्श रेड्डी यांच्या सहभागामुळे उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

टीमच्या या उपक्रमात संतोष जाधव, सचिन कापुरे, विलास जाधव, विजय गोरे, किशोर आंबेकर, समीर शहा, पृथ्वीराज भंडारे, प्रविण इंगळे, विनय कुलकर्णी, शैलेष सदार आणि इतर पर्यटकांनी देखील सहभाग घेतला. सर्वांनी मिळून गोळा केलेला कचरा नगर परिषदेच्या कचरा गाडीत व्यवस्थित टाकण्यात आला.

या उपक्रमाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण आणि प्लास्टिक मुक्त परिसराची संकल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोणारकर टीमच्या या सेवाभावी कार्यामुळे परिसरात स्वच्छता आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत होत आहे.

खासदार टाइम्स

खासदार टाईम्स {निडर, निष्पक्ष, प्रखर समाचार, खासदार की तलवार, अन्याय पे प्रहार!} हिंदी/मराठी न्यूज पेपर, डिजिटल न्यूज पोर्टल/चैनल) RNI No. MAHBIL/2011/37356 संपादक - खान एजाज़ अहमद, कार्यकारी संपादक – सय्यद फेरोज़ आशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button