कन्नड येथे सिरतुन्नबी सल्लालाहू अलैह व सल्लम कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी : अशरफ अली
कन्नड : दि रेहमानिया वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी कन्नड संचलित मोहम्मदिया उर्दू प्राथमिक शाळा, कन्नड येथे पैगंबर मोहम्मद (स.) यांच्या आगमनाच्या संदर्भात सिरतुन्नबी सल्लालाहू अलैह व सल्लम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सैय्यद अहेमद अली मोहम्मद अली साहब होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव मुजाम्मील पटेल साहब उपस्थित होते.
वर्ग केजी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरण करत उत्कृष्ट कामगिरी केली. सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले, आणि त्यांच्या योगदानासाठी विशेष बक्षिसे देण्यात आली. मुख्याध्यापिका कादरी सबाहत यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांना विशेष सन्मान दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नादिरा आलमास यांनी केले, तर खान नाजनीन मॅडम यांनी कार्यक्रमाचे स्वरूप तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. शिक्षकांच्या अथक परिश्रमांमुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी अल्लाहचे आशीर्वाद मागितले आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मार्गावर चालण्याची प्रार्थना केली.