लोणार शहरात विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी; मुख्याधिकारी व ST महामंडळाचा सक्रिय सहभाग
प्रतिनिधी : फिरदोस खान पठाण
लोणार : शहरातील स्वच्छता अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये एक पाऊल पुढे टाकत, नगर परिषद कार्यालय लोणारच्या नेतृत्वात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छ भारत अभियान २.० व स्वच्छता ही सेवा अभियान २०२४ अंतर्गत मा. मुख्याधिकारी विभा वराडे मॅडम यांच्या पुढाकाराने, तसेच स्वच्छता निरीक्षक योगेश साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत आठवडी बाजार व बस स्थानक परिसरातील संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. नगर परिषद सफाई कर्मचारी तसेच ST महामंडळाचे कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. सफाई कर्मचार्यांनी बाजार परिसर व बस स्थानकातील कचरा, प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे संकलन करून स्वच्छता केली.
सदर मोहिमेत शहर समन्वयक अथर रौनक अली, दरोगा याहया खान, आरोग्य लिपिक शेख सलीम शेख रफिक, बाबाराव घाटोढे आणि इतर नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते