AurangabadKannad
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी, नवी मुंबई: संचालक मंडळाच्या सदस्याच्या निवडीनिमित्त सत्कार
कन्नड प्रतिनिधी : अशरफ अली
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी, नवी मुंबईच्या शासन नाम निर्देशित संचालक मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सन्मानाचा सोहळा आयोजित करण्यात आला. हा सत्कार दुर्गा उत्सव समिती आणि सौ. उर्मिला ताई मनोज पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार समारंभात प्रमुख पाहुण्यांमध्ये संस्थापक अध्यक्ष केतन भाऊ त्रिभुवन, मंडळाचे अध्यक्ष संतोष भाऊ राठोड, उपाध्यक्ष जीवन भाऊ बेडवाल, वायडे काका, खिल्लारे काका, चव्हाण काका, तसेच अनिलजी खंबाट यांनी आपली उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी श्रीराम कॉलनीतील महिला आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.
समारंभात नवीन संचालक मंडळाच्या सदस्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यात आली आणि त्यांच्या आगामी कारकिर्दीला शुभेच्छा देण्यात आल्या.