Buldhana

लोणार येथे बौद्ध समाज संवाद यात्रा: वंचित बहुजन आघाडीचा प्रबोधनात्मक उपक्रम

लोणार प्रतिनिधी: फिरदोस खान पठाण

लोणार : वंचित बहुजन आघाडीच्या मेहकर-लोणार विधानसभा नेत्यांच्या नेतृत्वाखाली लोणार व मेहकर येथे बौद्ध समाज संवाद यात्रेच्या तयारीत कॉर्नर बैठकांचे आयोजन करण्यात आले. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, रेखाताई ठाकूर, अशोक सोनोने, धैर्यवर्धन पुंडकर, सविताताई मुंडे, निलेश जाधव, प्रशांत वाघोदे, विष्णू उबाळे आणि डॉ. प्रा. केबी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका घेण्यात आल्या.

लोणार शहरातील वडगाव, सुलतानपूर आणि चिंचोली सांगळे या ठिकाणी झालेल्या बैठकीत जिल्हा नेते आदरणीय प्रशांत वाघोदे यांनी आंबेडकरी चळवळीबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी समाजाने व्यसनमुक्त राहून आपल्या कुटुंबासह समाज उंचावण्याचे आवाहन केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर, बाळासाहेब आंबेडकर समाजजागृतीचे कार्य करत असून, त्यांच्या हातांना अधिक मजबुती देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, येणाऱ्या 11 तारखेला होणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रेला अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. प्रा. केबी इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिपक अंभोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या उषाताई नरवाडे, शाकीरभाई पठाण, महेंद्र मोरे, प्रशिष इंगळे, सुभाष मोरे, ॲड. बबन वानखेडे, दिपक पाडमूख, प्रदीप सरदार, अनिल प्रधान, अचित पाटोळ, मोरे साहेब (मिलिट्री मॅन), दिनकर कांबळे, बबन पनाड, विलास खरात आणि वसीम भाई यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शेकडो महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचा हा उपक्रम समाजातील एकता आणि जागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

खासदार टाइम्स

खासदार टाईम्स {निडर, निष्पक्ष, प्रखर समाचार, खासदार की तलवार, अन्याय पे प्रहार!} हिंदी/मराठी न्यूज पेपर, डिजिटल न्यूज पोर्टल/चैनल) RNI No. MAHBIL/2011/37356 संपादक - खान एजाज़ अहमद, कार्यकारी संपादक – सय्यद फेरोज़ आशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button