जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अली अलाना उर्दू हायस्कूलच्या क्रिकेट संघाचा पराक्रम: 19 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक
प्रतिनिधि : अशरफ अली
औरंगाबाद येथील गारखेडा स्टेडियममध्ये ११ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अली अलाना उर्दू हायस्कूल आणि ज्यु. कॉलेज कुंजखेडा, ता. कन्नड या शाळेच्या क्रिकेट संघाने १९ वर्ष वयोगटात प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. मोजक्याच दिवसांच्या सरावावर आधारलेला या विद्यार्थ्यांचा संघ अंतिम सामन्यात शानदार खेळ दाखवत जिल्ह्यात अव्वल ठरला.
या संघात साहिल खान, सोफियान शेख, तोसिम खान, फैजान खान, मोहम्मद हुजैफा, मोहसीन खान, साजिद पठाण, सोफियान खान, मुजक्कीर खान, अबुजर खान, अफसर खान, कामरान खान, आवेज खान, फैजान सुल्तान खान आणि अफरोज खान यांचा समावेश होता.
संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक एजाज शाह यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. या आनंदाच्या क्षणी जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा संयोजक आणि संस्थेचे सचिव मौलाना फारुक वस्तानवी, मुख्याध्यापक मोगल शरीफ बेग, तसेच शिक्षक मंडळी इकबाल अहमद, झहीर पटेल, सैय्यद साजिद अली, मोबिन पटेल, नजमुस्सहेर, फाहेका नसरीन, अताउलाह खान, वसीम खान, सना खान, सुमैय्या शेख, नगमा शादाब, एजाज अहमद, साकिब अहमद, अन्वर सिद्दिकी, सीमा शेख, रंदेरा हफसा आणि शिक्षकेतर कर्मचारी इब्राहिम खान आणि अतिक शेख यांनी संघाचे अभिनंदन केले.