कन्नड : राष्ट्रीय समाज पक्षाच्या कन्नड तालुका अध्यक्षपदी संतोष पुसे यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्ती दरम्यान महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते साहेब, प्रदेश प्रवक्ते डॉ. भास्करजी टेकाळे सर, मराठवाड़ा संपर्क प्रमुख अश्रुबा कोळेकर सर, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य मोहन जानकर साहेब, जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ कटारे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ म्हात्रे, युवक जिल्हा अध्यक्ष दिलीप रिठे, जिल्हा सचिव देविदास नजन, ग्रामीण युवक जिल्हा अध्यक्ष योगेश खाडे, तालुका अध्यक्ष माऊली वैध, तालुका अध्यक्ष रमेश काटकर, नंदूभाऊ धुपे, लक्ष्मण धनतोले आणि संजय पंडित इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
संतोष पुसे यांच्या या नियुक्तीने कन्नड तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तसेच पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.