Dhule

तिडका येथे भव्य कुस्ती स्पर्धेला उद्योजक व समाजसेवक मनोज भाऊ पवार यांची भेट; ५१,००० रुपये बक्षीस जाहीर

Ashraf Ali

१९ सप्टेंबर २०२४ रोजी शिरपूर तालुक्यातील तिडका येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आणि समाजसेवक श्री. मनोज पुष्पाबाई केशवराव पवार यांनी उपस्थिती लावली. क्रीडाक्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मनोज भाऊ पवार यांनी या स्पर्धेसाठी ५१,००० रुपये बक्षीस जाहीर केले. त्यांच्या या उदार योगदानामुळे कुस्तीपटू आणि उपस्थित ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह संचारला.

कार्यक्रमाच्या वेळी श्री. मनोज भाऊ पवार यांचा आयोजकांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच गुलजार भाई तडवी, कुस्ती स्पर्धेचे अध्यक्ष हकीम भाई सेठ आणि उपाध्यक्ष श्री. शांताराम भाऊ जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंचकमिटी सदस्यांत श्री. सतिष भाऊ बिलवाल, श्री. संतोष भाऊ घुले, अमीर भाई पटेल, श्री. किसन भाऊ खंबाट, श्री. संतोष भाऊ जाधव, ईश्वर भाऊ सपकाळ, रबीब भाई तडवी, श्री. अमोल भाऊ जाधव, श्री. रुपेश भाऊ पाटील, श्री. अनिल भाऊ निकम (गोंदेगाव), श्री. विशाल भाऊ राजपुत (पळाशी), श्री. समाधान भाऊ चोपडे (तितुर), श्री. दिनेश भाऊ राठोड, श्री. विलास भाऊ कोलते, श्री. भुषण भाऊ पवार (मुखेड) आणि श्री. स्वप्नील भाऊ राजपुत यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.

कुस्ती स्पर्धेने स्थानिक तरुणांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी दिली. उद्योजक मनोज भाऊ पवार यांच्या प्रोत्साहनामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी ठरला. कार्यक्रमात उपस्थित गावकऱ्यांनी आणि तरुणांनी या प्रोत्साहनाचे मन:पूर्वक स्वागत केले.

यावेळी आयोजकांनी सांगितले की, या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण भागातील कुस्तीचा वारसा पुढे नेणे आणि तरुणांना राष्ट्रीय पातळीवर पोहोचवणे आहे.

खासदार टाइम्स

खासदार टाईम्स {निडर, निष्पक्ष, प्रखर समाचार, खासदार की तलवार, अन्याय पे प्रहार!} हिंदी/मराठी न्यूज पेपर, डिजिटल न्यूज पोर्टल/चैनल) RNI No. MAHBIL/2011/37356 संपादक - खान एजाज़ अहमद, कार्यकारी संपादक – सय्यद फेरोज़ आशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button