कन्नड : मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने मुस्लिम आक्रोश मोर्चा काढण्याच्या तयारीत असून, यासाठी पोलिस निरीक्षकांना परवानगीसाठी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात यति नरसिंहानंद, रामगिरी महाराज आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाच्या धर्मगुरुंविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याचे सांगण्यात आले आहे, ज्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
मोर्चाचे आयोजन दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी शुक्रवार, दुपारी 2.00 वाजता महाराष्ट्र काटा, चाळीसगाव रोड, कन्नड येथून ते पिशोर नाका, आण्णासाठे चौक मार्गे तहसिल कार्यालय, कन्नड येथे होणार आहे. मोर्चात साधारण 2000 लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धर्मगुरु आणि नितेश राणे यांच्यावर शासनाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या निवेदनाच्या माध्यमातून मुस्लिम आक्रोश मोर्चासाठी पोलिसांकडून परवानगी मागण्यात आली आहे, जेणेकरून लोकशाही मार्गाने शांततापूर्ण मोर्चा काढता येईल.
मोर्चाचे आयोजक आणि मुस्लिम आक्रोश मोर्चा कन्नड शहर तालुका कमिटीच्या वतीने मा. पोलिस निरीक्षक साहेबांनी परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे, ज्यामुळे समाजातील नाराजी व्यक्त केली जाऊ शकते आणि योग्य न्यायाची मागणी केली जाऊ शकते.
या प्रसंगी अब्दुल जावेव अ. वाहेब, अयाज मकबुल शाह, शेख याकुब शेख महेमुद, सईदखान रशिद खान, मौलाना शकील शेख रशिद , सलीम खान जाफर खान, यासीन खान याकुब खान, अदनान अब्दुल रहेमान अल जिलानी, शेख इफ्तेखार अ. रऊफ , सलीम अब्दुल करीम सालीम, शेख जावेद इत्यादी शहर व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.