कन्नड: विधानसभा मतदारसंघ: महायुतीच्या उमेदवार संजना जाधव यांच्या प्रचारासाठी आज कन्नड तालुक्यात भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली. या सभेला प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती दिसून आली, ज्याने कन्नडवासियांचा उत्साह आणि संजना जाधव यांच्यावरील विश्वासाचे प्रतिक दिसले. शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून संजना जाधव यांनी आपल्या पक्षाचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे महत्व पटवून दिले.
यावेळी संजना जाधव यांनी कन्नड तालुक्यातील बहिणींना दिलेल्या “माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभाचा उल्लेख केला. या योजनेतून कन्नडमधील सुमारे १ लाख ६ हजार महिलांना लाभ मिळाला आहे. या लाभार्थी महिलांची संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीर साथ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेत संजना जाधव यांनी कन्नडच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. सोलापूर-धुळे महामार्गावर चाळीसगाव नजीक घाटाऐवजी बोगदा बांधण्याचे आश्वासन दिले. तसेच, तालुक्यात १०० खाटांचे आधुनिक रुग्णालय उभारणे, कृषी किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला मंजुरी देणे, फळांवर प्रक्रिया करणारा उद्योग उभारणे यांसारख्या विकास कामांची ग्वाही दिली.
त्यांनी कन्नड तालुक्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. उपस्थितांना उद्देशून संजना जाधव म्हणाल्या, “तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास, या सर्व कामांची पूर्तता करण्याचा माझा संकल्प आहे.”
या सभेतील नागरिकांचा प्रचंड उत्साह आणि उभे राहिलेले जनसागर, संजना जाधव यांच्या विजयाची नांदीच देत होता.